Thursday, April 07, 2011

अगदी सहजपणे जवळ आलो होतो,
तितक्याच सहजपणे दुरही झालोच ना.
फक्त तितक्या सहजपणे तुझ्या आठवणींपासून दूर नाही होता येत.


पूर्वी हसायला काहीही कारणं चालायची,
आता कारण असून सुद्धा हसत नाही.
कारण असून रडतही नाही मी आजकाल.

पूर्वी सोबत चालताना वाटेचं भानच नसायचं,
आज एकट्या माझ्याकडे बघताना वाटेला कससच वाटतं.
स्वतःसाठी नव्हे मी तिला वाईट वाटायला नको म्हणून वाट टाळतो.

तू भेटण्या आधी गुलाबाचा गंधच कळला नाही,
तू गेल्यावर सुकलेलं गुलाबही जपून ठेवलंय.
सवय आहे मला,तुझ्या बाबतीतही मी असंच तर केलंय.

हात कधी हातात येतील हे वाटलच नव्हतं,
हातातले हात सुटतील हेही वाटलच नव्हतं.
मला वाटतंय मी जगेन आता फार,पण मला वाटतंय तसं होतंय कुठे.

एकदा तू विसरलेला रुमाल आठवल्यावर आलेलीस घ्यायला,
मी हि तो छान घडी करून जपून ठेवला होता,
आता मला विसरलीयेस, स्वताला तसं जपणं कठीण आहे मला.
"जगण्या साठी पण वेळ नाहि......"
सारी सुखे पदरात आहेत
पण हसुन बघायला वेळ नाहि.
ह्या धावपळीच्या जिवनामधे
जगण्या साठी सुध्धा वेळ नाहि.

आईचे उपकार सदा स्मरतो
पण विचार पुस करायला वेळ नाहि.
सारी नाति तर मोडुन पडलीत
त्याना पुरायला पण वेळ नाहि.

सारी नांवे मोबाइल मधे आहेत
पण फोन करायला वेळ नाहि.
दुस~याना देण्याबद्दल काय बोलु
घरच्यांना द्यायला क्षण भर वेळ नाहि.

डोळ्यावर झोपेची झापड आहे,
झोप घ्यायला वेळ नाहि.
मन वेदनेन भरल आहे,
पण रडण्यासाठी वेळ नहि.

कमवण्याच्या शर्यतित असा पळतोय,
कि थकण्याला पण वेळ नाहि
दुस~यांच्या मनांचा काय करु विचार
स्वत:च्या स्वप्नासाठी सुध्ध वेळ नाहि

हे जिवना तुच आता सांग
ह्या आयुष्याच काय होणार,
प्रत्येक क्षणाला मरणारे आम्हि
जगण्या साठी पण वेळ नाहि......
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये!